Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस; विधिमंडळावर सहा मोर्चे धडकणार
आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विधानसभेत अवकाळी पावसावर चर्चा होणार असून अनेक मुद्द्यांवर देखिल चर्चा होणार आहे. तसेच आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे हे अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे.अनेक मुद्द्यांवर आज नागपुरात मोर्चे निघणार आहेत. आज विधीमंडळावर अनेक मोर्चे देखील धडकणार आहेत. विरोधी पक्ष नेते विजय बडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले तसेच काँग्रेस पक्षाचे नेते काँग्रेसच्या मोर्चात सहभागी होणार आहेत.
सकल धनगर समाज समन्वय समितीचा धनगरांच्या आरक्षणासाठी मोर्चा निघणार आहे तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने देखिल मोर्चा काढण्यात येणार आहे. भारत राष्ट्र समितीचा मोर्चा निघणार आहे. आदिवासींचा मोर्चा जनसेवा गोंडवाना पार्टीच्या वतीने विधीमंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण देण्यात यावे यासाठी देखिल मोर्चा काढण्यात येणार आहे.