महाराष्ट्र
Maharashtra Assembly Session : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक; विधानभवन परिसरात आंदोलन
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधक राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान यावरुन सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता विधानभवन परिसरात विरोधकांचे आंदोलन सुरु आहे. विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याची विरोधकांकडून मागणी करण्यात येत आहे. कापसाला 14 हजारांचा भाव देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. गळ्यात कापसाच्या माळा घालून हे विरोधकांचे आंदोलन सुरु आहे.