Mahad Taliye Landslide | राज्यात १६ हजार घराचं नुकसान; शरद पवार यांची माहिती

Mahad Taliye Landslide | राज्यात १६ हजार घराचं नुकसान; शरद पवार यांची माहिती

Published by :
Published on

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे लोकांचं अतोनात नुकसान झालं आहे. आठ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूराने कोकण, सातारा, सांगली याठिकाणी अपरिमित हानी झाली आहे. दरड कोसळून जवळपास251 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 100पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. यासह मुंबई, पुणे, अमरावती याठिकाणीही पूराने परिस्थिती अवाक्याबाहेर गेली होती. या नुकसानग्रस्त लोकांना एसडीआरएफच्या नियमानुसार मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

तर यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य शरद पवार यांनी, राज्यात १६ हजार घरांच नुकसान झाले आहे. तसेच पूरस्थितीचा अहवाल आल्यानंतर मदत करणार अशी माहिती यावेळी शदर पवार यांनी दिली.

राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं. तसेच नैसर्गिक आपत्तीत त्या भागाचा दौरा केल्यावर सर्व यंत्रणा नेत्यासाठी फिरवावी लागते. त्यामुळे कामात अडथळा येतो. म्हणून आपण पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलो नाही, असं पवारांनी सांगितलं. कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे होत आहेत त्याने धीर मिळतो. पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळं यंत्रणेला त्रास होतो. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही, त्यांनी या भागांचा दौरा टाळावा. ठिक आहे‌ राज्यपाल जात आहेत. त्यांचे केंद्राचे संबंध‌ चांगले आहेत‌. ते‌ जास्त मदत आणू शकतात, असंही ते म्हणाले.

आणि पंतप्रधानांनी विनंती मान्य केली

माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या वेळचा अनुभव आहे. अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे असे दौरे टाळावे. मी लातूरला असताना आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल. पंतप्रधानांनी माझी ही विनंती मान्य केली. त्यानंतर ते दहा दिवसाने लातूरला आले होते, असा अनुभवही पवारांनी सांगितला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com