गॅस सिलेंडर घेत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
गॅस सिलिंडरचा घरोघरी वापर केला जातो. त्यामुळे ही माहिती सर्वांसाठी महत्वाची आहे. आपण नेहमी एजन्सीतून गॅस सिलिंडर आणतो किंवा तो आपल्याला घरपोहोच होतो. परंतु, गॅस सिलिंडरशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असतात. घरगुती गॅस सिलंडरचा रंग लाल आणि आकार गोलकार का असतो? त्याची एक्स्पायरी डेट कशी तपासायची? अशा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशा अनेक प्रश्नांची तुम्हाला आज उत्तर मिळणार आहेत.
घरगुती गॅस सिंलिडर सर्वच घरांमध्ये असतो. केवळ शहरात नव्हे तर, आता ग्रामीण भागातही एलपीजी गॅसचा वापर वाढलाय. परंतु, याचा वापर करताना खुपच सावधगिरी बाळगावी लागते. अनेकदा यामध्ये मोठ्या दुर्घटना घडतात.तयामुले सिलिंडरची एक्स्पायरी डेट तपासणे अतिशय महत्वाचे आहे.
सिलिंडरची एक्स्पायरी डेट कशी तपासायची?
सिलिंडरची एक्स्पायरी डेट ओळखणे अतिशय सोपे आहे. हे समजल्यावर गॅस सिलिंडर फुटण्याचा वा लीक होण्याच्या टेन्शनपासून तुम्ही मुक्त व्हाल. सिलिंडरच्या रेग्युलेटरच्याजवळ 3 पट्ट्या असतात. त्यावर काही नंबर आणि इंग्रजी अक्षरात लिहलं जातं. एकीवर A, B, C, D लिहिलेले असते. A चा अर्थ आहे जानेवारी ते मार्च आणि B चा अर्थ एप्रिल ते जूनपर्यंत असा असतो. त्याचप्रमाणे C जुलै ते सप्टेंबर आणि D चा अर्थ ऑक्टोबर ते डिसेंबर असा होतो
सिलिंडरचा रंग लाल आणि आकार गोलाकार का असतो?
सिलिंडर कोणत्याही उच्च दाबाचा सामना करू शकत नाही. सिलेंडरला गोलाकार किंवा दंडगोलाकार आकारात बनवण्यामागे प्रेशर हे मुख्य कारण आहे. गॅस सिलेंडरला पाहिल्यावर दुसरा प्रश्न पडतो की त्याचा रंग लाल का असतो? आणि सर्व कंपन्यांच्या एलपीजी सिलेंडर चे रंग लाल च असतात. एलपीजी सिलेंडरला लाल रंग देण्याचे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे लाल रंग धोक्याचा संकेत असतो. जेवण बनवायच्या गॅस सिलेंडर अधिक ज्वलनशील असते. भलेही एलपीजी गॅस जेवण बनवण्यास मदत करते. पण ते कोणत्या धोक्यापेक्षा कमी नाही. एलपीजी गॅस खूप लवकर आग पकडते. अशामध्ये गॅसचा वापर करताना सावधानी बाळगायला हवी जेणेकरून यापासून होणाऱ्या मोठा धोका टळू शकेल.