लोकशाही हेल्पलाईन; ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्सचा तुटवडा असल्यास संपर्क साधा
'लोकशाही न्यूज'ने सामाजिक बांधिलकीचं भान जपत नवा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्याअंतर्गत आपल्या गावातील, शहरातील कोरोना संकटकाळात कमी पडत असलेल्या आरोग्य सेवांबाबत आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोना काळात बेड, ऑक्सिजन, लस अशा विविध समस्यांवर समाधान शोधण्यासाठी, राज्यकर्त्यांना राज्यातील कानाकोपऱ्यातील तुटवड्याची माहिती पोहोचावी यासाठी 'लोकशाही हेल्पलाईन' सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
याअंतर्गत तुम्ही गुरुवारी (29 एप्रिल) सायंकाळी सहा वाजल्यापासून थेट लोकशाही न्यूजवर संपर्क साधू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तसेच सर्व समस्यांवर समाधान शोधण्यासाठी लोकशाहीच्या व्यासपीठावर तुम्ही थेट लोकप्रतिधी, सरकारी अधिकारी, शल्यचिकित्सक यांच्यापर्यंत तुमची समस्या पोहोचवू शकता.
यासाठी आमच्या ०२२ – ६८७ ९९ १०२ या क्रमांकावर बुधवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून संपर्क साधा; आणि थेट सरकारला सवाल विचारा. याचसोबत आमचे फेसबूक आणि ट्विटर पेजवर तुम्ही व्यक्त होऊ शकता.
फेसबुक – Lokshahi News
ट्विटर – @news_lokshahi