सत्तांतराच्या वेळेस शिंदे गटाला रेड कार्पेट टाकून संरक्षण देणारे हे...; यशोमती ठाकूर संतापल्या

सत्तांतराच्या वेळेस शिंदे गटाला रेड कार्पेट टाकून संरक्षण देणारे हे...; यशोमती ठाकूर संतापल्या

काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरातच्या सुरत कोर्टामध्ये हजर राहणार आहेत. त्यांच्या समर्थनार्थ अनेक कॉंग्रेस नेते गुजरातमध्ये दाखल होत आहे.
Published on

अमरावती : काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरातच्या सुरत कोर्टामध्ये हजर राहणार आहेत. त्यांच्या समर्थनार्थ अनेक कॉंग्रेस नेते गुजरातमध्ये दाखल होत आहे. अशात, मुंबईवरून गुजरातला जात असताना त्यांना रस्त्यात दोन ते तीन वेळा अडवले असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी केला. यावेळी त्यांची झडती घेण्याचा प्रयत्न सुद्धा पोलिसांनी केला. यावर यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त करत याचा निषेध केला आहे.

सत्तांतराच्या वेळेस शिंदे गटाला रेड कार्पेट टाकून संरक्षण देणारे हे...; यशोमती ठाकूर संतापल्या
संजय शिरसाटांविरोधात 3 रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करणार : सुषमा अंधारे

यशोमती ठाकूर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत गुजरात सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्या गाडीला दोन ठिकाणी थांबवण्यात आलं. माझं आयकार्ड तपासण्यात आलं. सत्तांतराच्या वेळेस शिंदे गटाच्या आमदारांना रेड कार्पेट टाकून संरक्षण देणारे हेच ते गुजरातचे पोलीस आहेत, जे आज राहुलजींच्या समर्थनार्थ गुजरातला जाणाऱ्या काँग्रेसच्या आमदार आणि नेत्यांची चौकशी करतायत. मी अशा पोलीसी कारवायांना घाबरत नाही. अशा पोलीसी कारवायांचा मी निषेध करते, असे त्यांनी म्हंटले आहे.

तुम्हाला मला अटक करायची असेल तर करा मी घाबरत नाही. गप्प बसणार नाही. आमचं संभाषण थेट गांधीनगरला लाइव्ह चाललंय असं सांगण्यात आलं. तुम्ही गांधी नगरला लाइव्ह करा नाही तर पंतप्रधान कार्यालयाला. तुम्ही मला रोखू शकणार नाही, असा इशाराही यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com