Eknath shinde | raj thackeray
Eknath shinde | raj thackeray Team Lokshahi

मनसेसोबत युती होणार का? मुख्यमंत्री शिंदेंचे सूचक विधान

महापालिका निवडणुकीसाठी मनसे, भाजप आणि शिंदे गटाची युती होणार का? याबाबत एकनाथ शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी तीव्र होत असताना, अशातच शिंदे गट, भाजप आणि मनसे युती होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असता, आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे चित्र या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. याच युतीवर एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केले आहे.

Eknath shinde | raj thackeray
महाविकास आघाडी सरकार परत सत्तेत येणार; रुपाली ठोंबरे पाटलांचे शंभूराज देसाईंना प्रत्युत्तर

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना (शिंदे गटाने) पक्ष वाढीसाठी मोठे प्रयत्न सुरु केले आहे. दरम्यान, या घडामोडी मध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये जवळीकता वाढतच चालली आहे. सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तब्बल चार वेळा भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच युतीची चर्चा सुरु झाली. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आज सूचक विधान केले आहे. आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांची संख्या वाढत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यामुळे हे समविचारी पक्ष कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्या भेटी भागात समविचारी पक्ष मनसे असू शकतो असा देखील अंदाजा लावण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com