नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे अपात्र होणार का? अनिल परब म्हणाले...
ठाकरे गटाला मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांनी काही दिवसांपूर्वी सोडचिठ्ठी दीली. या तिघांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र आता अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब म्हणाले की, सध्या विधानपरिषदेत सभापती नाहीत त्याजागी उपसभापती काम बघणार आहेतकाही दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हे यांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे. त्यामुळं कायद्यानुसार, दहाव्या शेड्युलमध्ये २ अ नुसार जी अपात्रतेची तरतूद आहे.
तसेच गोऱ्हे या उपसभापती असल्यानं त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अपात्र व्हावं लागेल तसेच कायंदे यांच्यावरही लोकप्रतिनिधी कायद्याच्या १० शेड्युल प्रमाणं अपात्र व्हावं लागेल. असे अनिल परब म्हणाले.