Eknath Shinde | Bhupendra Patel
Eknath Shinde | Bhupendra PatelTeam Lokshahi

गुजरात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला एकनाथ शिंदे राहणार उपस्थित? राजकीय चर्चांना उधाण

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 156 जागांवर विजय, सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग.
Published by :
Sagar Pradhan
Published on

नुकताच गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. याच निवडणुकीत गुजरात भाजपने सर्वाधित 156 जागांवर विजय मिळवुन इतिहास रचला आहे. त्यानंतर आता तिथे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय. त्यामुळे तिथे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याच नेतृत्वात पुन्हा नवं सरकार स्थापन होणार असल्याचं स्पष्ट आहे. विशेष म्हणजे नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 12 डिसेंबरला सोमवारी आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाचं अधिकृत निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे.

Eknath Shinde | Bhupendra Patel
कोणेही यावे आणि आमची भाजी करावी, ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

माहितीनुसार, गुजरातमध्ये बहुमतासह भाजप सरकार स्थापन करणार आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. NDAचा मित्रपक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांना भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आल आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना शपथविधीचं निमंत्रण आल्यानंतर महाराष्ट्रात सर्वसामान्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com