बाळासाहेब थोरात करणार भाजप प्रवेश? बावनकुळे म्हणाले...
मुंबई : नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात यांचा वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर थोरात भाप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर भाष्य केले आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अजून कोणतेही नेतृत्वाला प्रवेश करण्यास भाजपचे दरवाजे खुले आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या सारख्या ज्येष्ठ नेते ज्यांनी ९ वेळा विधानसभेत काम केले. काँग्रेसचे विचार सर्वजनमाणसात पोहोचवण्याचे काम केले. काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. काँग्रेस हे डुबते जहाज आहे. थोरात यांच्यासारखे नेते नाराज होत असतील तर आत्मचिंतन करावे लागेल.
२०२४मध्ये महाविकास आघाडीतील पक्षांना उमेदवार मिळणार नाहीत. सत्यजित तांबे अपक्ष होते. त्यांनी भाजपात प्रवेश करण्याची प्रस्ताव दिला नाही. स्थानिक पातळीवर त्यांना मदत करण्याचे पक्ष नेतृत्त्वाने सांगितले होते. आम्ही काहीही ऑफर दिलेली नाही. त्यांना वाटले तर प्रवेश करण्यासाठी भाजपाचे दरवाजे खुले आहेत, असे बावनकुळे यांनी म्हंटले आहे.
बाळासाहेब थोरात असो किंवा अजून कोणतेही नेतृत्वाला प्रवेश करण्यास भाजपचे दरवाजे खुले आहेत. थोरात यांच्या रक्तात काँग्रेस आहे. त्यांनी कधीही कॉम्प्रॉमाइज केले नाही. सहकार क्षेत्रात व उत्तर महाराष्ट्रात त्यांचे मोठे काम खूप मोठे काम केले. अशा नेतृत्वासारखं कोणी नाराज असेल तर आत्मचिंतन करण्याची गरज असून राज्याचा अध्यक्षाची जबाबदारी आहे.
नाना पटोले यांना मी सल्ला देत नाही. मला अधिकार नाही. पक्षाचा अध्यक्ष हा प्रमुख असतो. माझ्या पक्षात बुथ कार्यकर्ता नाराज असेल तर मी त्याच्या घरी जाईल. थोरातांसारखे ज्येष्ठ नेते माझ्या पक्षात नाराज असतील तर मी स्वतः फोन करून तात्काळ संपर्क साधेल.
आमचा बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीशी कोणतीही संबंध नाही. पण पक्ष हा सर्वांचे स्वागत करतो. आमचा सर्वव्यापी पक्ष आहे. अनेक कार्यकर्ते येण्याची तयारी आहे. अनेक प्रवेश दिसतील. आम्ही बाळासाहेब थोरात यांना ऑफर दिली नाही. बाळासाहेब थोरात एवढे लहान नेते नाहीत. एवढा लहान विचार ते करणार नाहीत. त्यांची जी उंची आहे त्याहून जास्त राहील याची काळजी भाजप घेईल, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.