फडणवीसांच्या भेटीनंतर अशोक चव्हाण करणार भाजप प्रवेश? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

फडणवीसांच्या भेटीनंतर अशोक चव्हाण करणार भाजप प्रवेश? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

अशोक चव्हाण काही आमदारांसह काँग्रेसला रामराम करणार असल्याची शक्यता
Published on

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशोक चव्हाण काही आमदारांसह काँग्रेसला रामराम करणार अशा शक्यता वर्तविण्यात येत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

केंद्रीय मंत्री नाराजयण राणे यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदेनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी फडणवीस-चव्हाण भेटीबद्दल विचारले असता ते म्हणाले, आपण काँग्रेससंदर्भात भाष्य करणार नाही. मी सभागृहात बोललोय. त्यांची जी फरफट सुरु आहे ती आपण पाहत आहोत. कोणावर टीका करण्याचा माझा स्वभाव नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले आशीष कुलकर्णी यांनी वरळी येथील आपल्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. याचवेळी अशोक चव्हाण तेथे पोहोचले. व त्यांची भेट झाली. यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाणा आले आहे. परंतु, फडणवीस आणि चव्हाण यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. परंतु, शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार असून त्यात यामध्ये कॉंग्रेस नेत्यांची वर्णी लागणार असल्याची माहितीही सुत्रांकडून समजत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com