“जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी”? सामनातून राऊतांचा हल्लाबोल
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेल्यानंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांसह विरोधकांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे पुत्र आशिष यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशांमार्फत हिंसाचाराच्या चौकशीची घोषणा केली.
तर दुसरीकरडे प्रसिध्द अभिनेता शाहरुख खानचा मुलगा जहाजावर रेव्ह पार्टी करताना सापडला. या दोन प्रकरणांवरुन सध्या देशात राजकारण सुरु आहे. याच सर्व प्रकरणावर सामनाच्या अग्रलेखातुन भाष्य करण्यात आले असुन यात त्यांनी "शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचे रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसने आणि थेरं कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर 'जय जवान, जय किसान'चे नारे कशासाठी द्यायचे"? बंद करा ती थेरं! असे म्हटले आहे.
शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने भरधाव गाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसवून शेतकऱ्यांना ठार केले. त्यामुळे आंदोलक भडकले व हिंसाचार झाला. इतके मोठे मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुख खानच्या मुलाने 13 ग्रॅम ड्रग्ज घेतल्याच्या बातम्यांचा पाठलाग करीत आहे. ,' असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.