गोविंद बागेत उपमुख्यमंत्री अजित पवार का गैरहजर? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण...
आज दिवाळीचा पाडवा सर्वत्र साजरा होत आहे पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत येत असतात या ठिकाणी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. मात्र या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर आहेत.
यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिलेले आहेत. त्याचबरोबर आज महाराष्ट्र मध्ये महागाई बेरोजगारी यातून आपली मुक्तता व्हावे अशीच या निमित्ताने प्रार्थना करते.
आज रोहित पवार हे बीडमध्ये संघर्ष यात्रा करीत आहेत. त्यांचं मी मनापासून कौतुक करते. महाराष्ट्राच्या नवीन पिढीसाठी रोहित पवार हे संघर्ष करतात त्याचा मला अभिमान आहे. रोहित पवार यांने जनतेला शब्द दिला होता त्यानुसार त्याने संघर्ष यात्रा काढलेले आहेत असं काढली आहे. अजित दादांना डेंगू झाल्याने ते या ठिकाणी उपस्थित नाहीत.
जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारले पाहिजे. अर्धा ग्लास हा नेहमी अर्धाच असतो तो रिकामा नसतो देवाने मला आयुष्यात खूप गोष्टी शिकवल्या आणि यातून मी फार काही शिकले आहे. असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.