Chhagan Bhujbal: शरद पवारांची भेट का घेतली? छगन भुजबळांनी सांगितले...
छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळत आहे. छगन भुजबळ सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेणार आहेत. छगन भुजबळ यांनी काल बारामतीमध्ये झालेल्या सभेत बोलताना नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी सांगितले की, पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळ पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले की, मी आज सकाळी पवार साहेबांकडे गेलो होतो. साधारण सव्वा दहाला मी तिथे गेलो होतो ते झोपले होते. त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे. त्यामुळे मी एक-दीड तास थांबलो. आणि मग त्यांनी मला बोलवलं. त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते झोपले होते.
आम्ही दोघांनी जवळ-जवळ दीड तास चर्चा केली. आणि मी त्यांना सांगितलं की मी इथे कोणतं राजकारण घेऊन आलेलो नाही. मंत्री म्हणून सुद्धा आलेलो नाही आणि आमदार म्हणूल सुद्धा आलेलो नाही. पण हे महाराष्ट्रामध्ये ओबीसींना काम देण्याचं काम तुम्ही राबवलं. आता राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की हे शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यांना आठवण करुन दिली बाबासाहेब आंबेकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना असाचा मराठवाडा पेटला होता. अशा वेळी तो शांत करुन तुम्ही निर्णय घेतला की सरकारचं काय होईल ते होईल पण आपण हे काम केलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही बाबासाहेबांचं नाव त्याला जोडलं. पण आज अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही आलात नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला काही माहित नाही की जरांगेला मुख्यमंत्री भेटले त्यांनी काय चर्चा केली, आश्वासन दिली हे आम्हाला माहित नाही असं साहेबांचं म्हणणं होतं.
त्यांना सांगितलं सगळ्यांना उपोषण करणाऱ्यांना की कृपया तुम्ही उपोषण सोडा. कारण असं उपोषण करुन चर्चा होऊ शकणार नाही आपण चर्चा करुन काही मार्ग काढला पाहिजे एवढेच मी त्यांना सांगितलं. बाकी आता जरांगेंना जे मंत्री भेटले त्यांनी काय सांगितलं हे मला माहित नाही ते तुम्ही विचारलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे. आणि तुम्ही आजा राज्यातले सर्वात ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्वात समाजघटकाची काय परिस्थिती आहे याचा अभ्यास तुम्हाला सर्वात जास्त आहे.
आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही, त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आम्ही आलो नाही कारण आम्हाला माहितचं नाही तुमची काय चर्चा झाली. आणि लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते. म्हटले ठिक आहे तुम्ही बोलवा कोणकोणाला आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत. तर ते म्हणाले नको माझ्याकडून मीच आता असं करु कोणा-कोणाची काय-काय मतं आहेत, सर्व पक्षातले कोण-कोण आहेत.
मग ते म्हणाले की असं करतो एक-दोन दिवसांत मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही लोकं जी आहेत आम्हाला पाहिजे आहेत ते आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं, काय होतंय आणि काय करायला पाहिजे आणि कशाप्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे. आता सध्या माझी तब्येत पण खराब आहे पण दोन दिवसांमध्ये मी करीन. आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही बोलवलं, सांगितलं तर सगळे मंत्री येणार मुख्यमंत्री पण येणार चर्चा होणार. एक मला सांगायचं आहे हा प्रश्न मला सोडवायचा आहे मराठा समाजाचा, ओबीसींचा आणि हा वातावरण हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे. यासाठी अर्थात मी कोणालाही भेटायला तयार आहे असं छगन भुजबळ पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.