बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? SIT चौकशी करा; राऊतांची मागणी

बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? SIT चौकशी करा; राऊतांची मागणी

शिंदे गटाच्या 'AU'ला शिवसेनेचे 'ES'ने उत्तर
Published on

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोनवर AU नावाने एक नंबर सेव्ह असल्याचा दावा शेवाळेंनी केला होता. याला शिवसेनेने आता ES ने उत्तर दिले आहे. ठाण्यातील बिल्डर सुरज परमार आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.

बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? SIT चौकशी करा; राऊतांची मागणी
आंदोलन करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे : सुषमा अंधारे

संजय राऊत म्हणाले की, ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत. त्यांच्याविरोधात एसआयटी चौकशी लावा. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि भाजपा त्यांना पाठीशी घालत आहे. लावा चौकशी, एसआयटी नेमा.

राज्यपालांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अपमानाच्या वक्तव्यांची एक मालिकाच चालवली आहे. असं होऊनही भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावर बसून आहेत आणि भाजपा त्यांचं भजन गात आहे. हा काय प्रकार आहे? यावरच एसआयटी स्थापन झाली पाहिजे. एसआयटी सुरज परमार यांच्या डायरीवर स्थापन झाली पाहिजे. मात्र, ते तसं करत नाहीत. ते विरोधीपक्षांवर एसआयटी लावत आहेत. इतकं सुडबुद्धीने वागणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच आले नव्हते, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? SIT चौकशी करा; राऊतांची मागणी
फडणवीस, राणेंच्या दाव्याला सीबीआयचा दुजोरा; म्हणाले, दिशा सालियन प्रकरण...

दरम्यान, अधिवेशनात राहुल शेवाळे म्हणाले की, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोनवर AU नावाने एक नंबर सेव्ह आहे. तो नंबर AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे यांचा आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यावरुन हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com