राजकारण
काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला मिळणार विरोधी पक्षनेतेपद? ही नावं चर्चेत
आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.
आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.या अधिवेशनात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सध्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी पाच नावे चर्चेत आहेत. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार, नाना पटोले. यांची नावं चर्चेत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करतील. ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्यांचा विरोधी पक्षनेता आणि विधान परिषदेची विरोधी पक्षनेता असं ठरलेले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता म्हणून कोणाच्या नावाची घोषणा होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.