पंचायत निवडणुकीत ममतांच्या टीएमसीनं मारली बाजी, भाजप कितव्या स्थानावर?

पंचायत निवडणुकीत ममतांच्या टीएमसीनं मारली बाजी, भाजप कितव्या स्थानावर?

पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच (टीएमसी) भाजपच्या वरचढ ठरला आहे.
Published on

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच (टीएमसी) भाजपच्या वरचढ ठरला आहे. या निवडणुकीत टीएमसीने 3317 जागांपैकी एकूण 2552 जागा जिंकल्या आहेत.

टीएमसीने 232 पंचायत समिती आणि 20 पैकी 12 जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या आहेत. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण 212 ग्रामपंचायती आणि सात पंचायत समित्या भाजपने जिंकल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषदेत भाजपचे खाते उघडू शकले नाही. अनेक जागांवर अद्यापही निकालाची प्रतीक्षा आहे.

पंचायत निवडणुकीत ममतांच्या टीएमसीनं मारली बाजी, भाजप कितव्या स्थानावर?
...ही तर मिरच्यांची धुरी; संजय राऊत यांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

ममता बॅनर्जी यांनीही पंचायत निवडणुकीत त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. पंचायत निवडणुकीत टीएमसीचा आवाज मजबूत राहिला. या विजयाबद्दल आम्ही जनतेचे आभार मानतो. या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही देखील आभारी आहोत. राज्यातील जनतेच्या हृदयात फक्त तृणमूलच आहे हे या निवडणुकीच्या निकालाने सिद्ध केले आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लोकप्रियतेची चाचणी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणांहून हिंसाचाराच्या बातम्याही येत होत्या. त्यानंतर या हिंसाचारावर टीएमसी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडल्या. या निवडणुकीत हिंसाचारात सुमारे 40 लोकांचा मृत्यू झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com