Ajit Pawar : 'मुस्लिमांवर अन्याय होत असेल तर दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करू'; अजित पवारांचं आश्वासन

वफ्फ बोर्ड विधेयकाबाबत अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

वफ्फ बोर्ड विधेयकाबाबत अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. मुस्लिमांवर अन्याय होत असेल तर दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करू असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांचं मुस्लीम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे. गरज पडल्यास आम्ही केंद्र सरकारसोबत चर्चा करू असं अजित पवार म्हणाले. दरम्यान मालेगावात मुस्लीम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेतली होती, त्यावेळी अजित पवारांनी त्यांना आश्वासन दिलं.

मुस्लिम संघटनाशी संवाद साधताना अजितदादा यांनी मोठे विधान केले. अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचा प्रमुख या नात्याने सांगतो की, जर वफ्फ बोर्डबाबत लोकसभेत आणलेला बिलात जर तुमच्यावर अन्याय होत असेल, तर एनडीएचा घटक पक्ष असल्यामुळे मी स्वतः केंद्र सरकार, नितीश कुमार, चंद्रबाबु नायडू, चिराग पासवान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही सर्व या बाबत चर्चा करू. कोणतेही काम राज्यात आणि दिल्ली केंद्रात होत असेल तर त्यात कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. अजितदादा यांची मुस्लिम संघटना यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com