खोटारड्या सभा बंद करा, अन्यथा सभेत जाऊन उत्तर देऊ, बावनकुळेंचा आदित्य ठाकरेंना इशारा
राज्यात अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु असताना, वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनेक आरोप- प्रत्यारोप या दरम्यान सुरु झाले. त्यावरून वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा
बावनकुळे यांनी वेदांतावर बोलताना म्हणाले की, वेदांत प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. त्यांनी त्या काळात वेदांतासोबत कुठलाही एमओयू केला नव्हता. त्यांना जागा दिली नव्हती. असा खुलासा करत बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
आदित्य ठाकरे यांना इशारा
पुढे बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंवर प्रहार करत म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीने खोटारडे आंदोलनं करु नये. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित दादा आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांनी जनतेची माफी मागावी. यानंतर खोटे आंदोलनं केली नाही, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तर त्यांच्या खोटारड्या सभेत जाऊन त्यांना आम्ही उत्तर देऊ. असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांना दिला.
तीन दिवसांत मदतीचे वाटप
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पूर्व विदर्भात 1 हजार 191 कोटी रुपये दिलेत. इतकी मोठी मदत कधीही मिळाली नाही. यामुळे मी शिंदे – फडणवीस सरकारचं धन्यवाद मानतो. ही मदत तीन दिवसांत वाटप होईल. असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.