वर्ध्यात उन्हाच्या तडाख्याने संत्रा फळाला फटका
भूपेश बारंगे|वर्धा: कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृग बहाराचा संत्राच उत्पन्न घेतलं जातं. जानेवारी ते मार्च महिन्याच्या काळात संत्रा फळ विक्रीला येते. या वर्षी संत्रा उत्पन्नात मोठं घट झाली आहे. त्यामुळे अनेक संत्रा बाग फळविना आहे.काही ठिकाणी तर संत्रा बागेला क्वचित फळ धारणा झाली आहे.यावर्षी संत्राचे उत्पन्न कमी असल्याने संत्रा फळाला चांगला दर मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांना होती. मात्र संत्राल्या अत्यंत कमी दर असल्याने शेतकऱ्यांना लागणार खर्च निघेना झाला आहे.
सततच्या पाऊस त्यात अतिवृष्टीमुळे खरीप व रब्बी पिकाला चांगलाच फटका बसला आहे.संत्रा फळावर शेतकऱ्यांची आशा होती, मात्र तीही आशा आता निष्फळ ठरली आहे. फेब्रुवारी महिन्यातच तापमान तडाखा वाढू लागल्याने संत्रा फळाला चांदणीचा डाग पडू लागल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.या 'चांदणी' डागामुळे संत्रा फळ रस सोसून घेत असल्याने संत्रा फळाची चव निघून जात आहे.यातच मोठ्या प्रमाणात संत्रा फळाची गळ होत आहे. त्यामुळे संत्रा फळाला चांगलाच फटका बसला आहे.यामुळे विक्रीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या संत्रा फळ 30 हजार ते 40 हजार रुपये टन मागणी होत आहे. तरोडा येथील शेतकरी पुरुषोत्तम देशमुख यांच्या शेतात सहाशे संत्राचे झाड आहे.त्यातील चारशे संत्रा झाडांना फळ आली आहे.मात्र त्यावर मोठ्या प्रमाणात चांदणीचा डाग आल्याने संत्रा बागेकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरकवली आहे. हातातोंडाशी आलेला घास उन्हामुळे हिरावल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
चांदणीच्या डागामुळे संत्रा फळाला गळ
फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकत आहे.त्यामुळे संत्रा फळाला चांगलाच चटका बसला आहे. त्यात संत्रा फळाला चांदणीचा डाग पडत आहे.यामुळे संत्रा फळातील रस सोसून घेत असल्याने फळाची चव निघून जात आहे. यामुळे फळाची मागणी होत नसल्याने शेतकऱ्यांत नैराश्य वाढत आहे.
यावर्षी आपल्या परिसरात अल्प प्रमाणात संत्रा बागाला फळ आले आहे.त्यामुळे यावर्षी प्रति टन 60 हजार ते 70 हजार भाव संत्रा फळाला मिळावी अशी आशा होती.मात्र सध्या 35 ते 40 हजार प्रति टन भाव असल्याने लावलेला खर्च निघणार नाही आहे.फळधारणा पासून संत्रा बागेला मुलाप्रमाणे जपावे लागतात.आता दर कोसळल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.असे शेतकरी निरंजन चोपडे यांनी सांगितले.