Lok Sabha Election 2024: देशातील 89 लोकसभा मतदारसंघात आज मतदान

Lok Sabha Election 2024: देशातील 89 लोकसभा मतदारसंघात आज मतदान

लोकसभा निवडणूक 2024 मधील दुसऱ्या टप्प्यासाठी आज 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. अनेक मतदान केंद्रांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Published on

लोकसभा निवडणूक 2024 मधील दुसऱ्या टप्प्यासाठी आज 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. अनेक मतदान केंद्रांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देशातील 89 मतदार संघात मतदान होईल. यामध्ये सर्वात प्रतिष्ठेचा वायनाड मतदार संघ पण आहे. राहुल गांधी येथून निवडणूक लढवत आहे. तर राज्यात हायहोल्टेज ठरलेल्या अमरावतीमध्ये आज मतदान होणार आहे.

देशातील 13 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील 89 जागांवर आज मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात केरळ राज्यातील 20 लोकसभा जागांवर मतदान होणार. कर्नाटकमधील 14, राजस्थानमधील 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8, आसाम आणि बिहारमधील 5, पश्चिम बंगालमधील 3 तर त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमधील 1 जागेचा समावेश आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, देशात 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडत आहे. त्यातील 19 एप्रिल रोजी पाच मतदारसंघात मतदान झाले. राज्यातील पूर्वी विदर्भातील मतदारसंघाचा त्यात सहभाग होता. आता राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होईल. पुढील टप्प्यात 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com