मुलगी आणि नवजात बाळ गमावले, कुटुंबाने वडेट्टीवारांसमोरच फोडला टाहो

मुलगी आणि नवजात बाळ गमावले, कुटुंबाने वडेट्टीवारांसमोरच फोडला टाहो

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नांदेड येथे भेट दिली.
Published on

नांदेड : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेवरून आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नांदेड येथे भेट दिली.

मुलगी आणि नवजात बाळ गमावले, कुटुंबाने वडेट्टीवारांसमोरच फोडला टाहो
बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत शिंदे गटातील नेत्याने दिली माहिती; रोहित पवारांनी सांगितले

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. यावेळी एका कुटुंबाने आपली मुलगी आणि तिचे नवजात बाळ गमावले, त्या कुटुंबाने वडेट्टीवारांसमोरच टाहो फोडला. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे. खूप चीड येत आहे सत्तेत बसलेल्या निष्ठुर सत्ताधाऱ्यांची. थोडी तरी माणुसकी शिल्लक असेल तर सत्तेची मलाई खाणाऱ्यानी डोळे उघडावे, अशी जोरदार टीका विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

दरम्यान, नागपूर येथेही नांदेडची पुनरावृत्ती घडली आहे. यावरही विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील काही दिवसापासून महाराष्ट्राची सकाळ अशा दुःखद बातम्यांनी होत आहे. ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि आज नागपूर. आणखी किती जिल्ह्यांच्या बाबतीत अशा दुःखद बातम्या पुढे येतील ही चिंता आहे. ट्रीपल इंजिन सरकारने सर्व शासकीय रुग्णालये- दवाखाने हे अक्षरशः भंगारखाणे करून ठेवले आहे.तिकडे तीनही पक्षाचे नेते रुसवे - फुगवे सोडवण्यासाठी, स्वतःच्या पक्षातील नेत्यांच्या खुर्चीची सोय लावण्यासाठी दिल्ली प्रदक्षिणा करताय, असा निशाणा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सोडला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com