...तर सरकारला ओबीसी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल; वडेट्टीवारांचा इशारा
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे आता राज्याचा दौरा करणार आहेत. सरकारला दिलेल्या 40 दिवसाच्या अल्टिमेटम पैकी येत्या 14 ऑक्टोबर रोजी 30 दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. सर्व मराठ्यांना ओबीसीमधून प्रमाणपत्र द्यावे. ही मागणी संविधनिक नाही कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही आणि प्रमाणपत्र देऊ नये. आमची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर वेगळी कॅटेगरी करून आरक्षण द्यावे. त्यासाठी संसदेत कायदा करावा लागेल. हे न करता सरसकट प्रमाणपत्र देणे हे न्याय उचित नाही, असे मत विजय वडेट्टीवार यांनी मांडले आहे.
यानंतर पुरावे गोळा करत आहेत. त्यात काही हजार नोंदी मिळाले तर सरसकट प्रमाणपत्र द्यावे ही मागणी कोणी मान्य करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध नाही. पण पाच हजार नोंदी वर सरसकट समाजाला प्रमाणपत्र देणे याला विरोध आहे. राज्य सरकारच्या हातात अधिकार नाही ते थापा का मारत आहे? धनगर समाज फसवणूक केली. अजूनही तेच करत आहे. त्या समाजाचे मागासलेपण सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रमाणपत्र देता येणार नाही. आणि तरी दिले तर सरकारला ओबीसी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.