दादांचं मतपरिवर्तन झालं तर त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण होईल; वडेट्टीवारांच्या विधानाची चर्चा

दादांचं मतपरिवर्तन झालं तर त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण होईल; वडेट्टीवारांच्या विधानाची चर्चा

अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांच्या विधानावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Published on

नागपूर : माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दादांचं मतपरिवर्तन झालं तर त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण होईल, असे त्यांनी म्हंटले आहे. या विधानावरुन महाविकास आघाडीत आले तर दादा मुख्यमंत्री होतील, असे संकेत वडेट्टीवारांनी दिल्याची चर्चा होत आहे.

दादांचं मतपरिवर्तन झालं तर त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण होईल; वडेट्टीवारांच्या विधानाची चर्चा
माझ्या देखतच मुलानं मुख्यमंत्री व्हावं; अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा

ग्रामीण भागात महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल आहे. ८० टक्के ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता असेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. तर, प्रत्येक आईची इच्छा असेलंच. आईचे स्वप्न असतातंच. मात्र, ते स्वप्न पूर्ण कशे होणार आणि पूर्ण कोण करणार? असं दूर दूर दिसत नाही. अजित दादा यांच्या आईचे स्वप्न पूर्ण होईल अशी परिस्थिती नाही. राज्यात सत्तापरिवर्तन होईल, असा दावा त्यांनी केला आहे. दादांचा मतपरिवर्तन झालं तर त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण होईल, असेही वडेट्टीवारांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांचे मतदारसंघात दुष्काळ जाहिर केला आहे. तोंड पाहून दुष्काळ जाहिर केला आहे. कापसाला आणि सोयाबीनला दर का मिळत नाही? सोयाबीनचं निम्म पिक हातचं गेलंय. पश्चिम महाराष्ट्राच्या वातावरणात सुट होणारं बियाणं विदर्भात दिलं. सोयाबीनचा २ हजार रुपये क्विंटल, आणि कापसाला ३ हजार रुपये प्रति क्विंटल बोनस जाहिर करावा नाहीतर शेतकरी आत्महत्या वाढणार, अशी भीती त्यांनी वर्तवली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com