'लोकशाही'ने सौमय्यांचे खरं रुप समोर आणलं; विद्या चव्हाणांचा घणाघात

किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. यावर विद्या चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई : किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच, विद्या चव्हाण यांनी किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'लोकशाही'ने सौमय्यांचे खरं रुप समोर आणलं; विद्या चव्हाणांचा घणाघात
कमलेश सुतार यांच्याविरोधातील गुन्हा त्वरित मागे घ्यावा; अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया

लोकशाहीने लोकशाही मार्गाने किरीट सोमय्यांचे खरे रुप लोकांसमोर आणले. हा संवैधानिकरित्या माध्यमांना अधिकार आहे आणि तो अधिकार हिरवून घेणारे फडणवीस कोण आहेत? असा सवालच विद्या चव्हाण यांनी विचारला आहे. फडणवीसांकडे गृहखाते आहे परंतु, त्यांनी सोमय्यांची काय चौकशी केली? उलट कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल केला.

मी सुतार यांचे अभिनंदन करते की त्यांनी सोमय्यांचे खरे रुप समोर आणलेले आहे. आता फडणवीसांचेही खरे रुप दिसत आहे. ते नेहमी विधी आणि न्याय खात्याचा गैरवापर करतात. ते गृहखात्याचा गैरपवापर करत आहेत आणि गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचे काम फडणवीसांनी केलेलं आहे. पंतप्रधान मोदी किंवा शिंदे-फडणवीसांनी एकतर हुकुमशाही घोषित करावी आणि नंतर जे वाटेल ते करावे. परंतु, अशाप्रकारे माध्यमांचा गळा घोटण्याचे काम सहन केले जाणार नाही. सुतार यांच्या पाठिशी सर्व जनता उभी राहिल्याशिवाय रहणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com