Prasad Lad | Vidhan Parishad
Prasad Lad | Vidhan Parishadteam lokshahi

प्रसाद लाड यांनी तेव्हा राष्ट्रवादीला दिला होता मोठा धक्का, नेमकं काय घडलं होतं

शरद पवारांच्या खेळीमुळे प्रसाद लाड यांचा देखील एकदा पराभव झाला होता
Published by :
Shubham Tate
Published on

Vidhan Parishad Election : राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पहायला मिळाले. राज्यसभेच्या फटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाल्याचे दिसून आले होते. मागच्या विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला पहायला मिळत होता. तो भाजपा नेत्यांनी अनेकदा बोलून ही दाखवला त्यामुळे ही निवडणूक चुरशीची पहायला मिळाली. राज्यसभेतील चुका लक्षात घेत सर्व आमदारांनी योग्य ती खबरदारी घेत मतदान केले. आणि सर्व आमदारांची मतं वैध ठरली आहेत. मात्र काँग्रेसने आक्षेप घेतलेली भाजपची दोन्ही मतेही वैध ठरली आहेत. (Vidhan Parishad election Prasad Lad news)

Prasad Lad | Vidhan Parishad
पाच प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन Amazon वर 10 हजार जिंकण्याची संधी

सध्या भाजपात असलेले प्रसाद लाड याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. प्रसाद लाड (Prasad Lad) हे मूळचे उद्योगपती आहेत. ते मुंबईत क्रिस्टल सुरक्षा एजन्सी चालवतात तसेच मुंबई बँकेचे ते संचालक ही आहेत. लाड यांनी2017 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे तब्बल 9 आमदार फोडले होते. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतरच्या एका निवडणुकीत लाड यांच्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलीप माने यांना रिंगणात उतरवले होते आणि मत फुटल्याने प्रसाद लाड विजयी झाले होते.

यापुर्वीही जगतापांशी झाला होता सामना

यापूर्वी देखील भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड असा विधान परिषदेचा सामना रंगला होता. काँग्रेसकडून भाई जगताप तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाकडून प्रसाद लाड उमेदवार उभे होते. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खेळीमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपली भूमिका बदलत भाई जगताप यांना निवडून दिले. येथे प्रसाद लाड यांचा पराभव झाला आणि त्यानंतर प्रसाद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com