'जवाहरलाल नेहरूंची पापे लपवण्यासाठी ते सावरकरांचे नाव घेतात'
मिनाक्षी म्हात्रे | मुंबई : खासदारकी रद्द झाल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घेत मोदी सरकार टीका केली होती. यावर आता वीर सावरकरांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वीर सावरकरांचे नातू टीटी रणजित यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. सावरकरांनी कधीच माफी मागितली नाही, राहुलला ते सावरकर नाहीत हे सांगायची गरज नाही. जवाहरलाल नेहरूंची पापे लपवण्यासाठी ते सावरकरांचे नाव घेतात, असा जोरदार घणाघात त्यांनी केला आहे.
सावरकरांनी कोठेही माफी मागितलेली नाही. मी राहुल गांधींना हे सिद्ध करण्याचे आव्हान देतो. मी अनेक पुरावे सादर केले असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे खुद्द राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात अनेकदा माफी मागितली आहे, असे टीटी रणजित यांनी म्हंटले आहे.
ते कितपत सत्ता मिळवणार हे दिसत आहे. भारताचा छुपा इतिहास लोकांसमोर आला आहे, भारताच्या फाळणीला फक्त जवाहरलाल नेहरूच जबाबदार आहेत हे सत्य सर्वांना कळेल की काय अशी भीती त्यांना वाटत आहे. 9 मे 1947 ला निषेध केला होता, 36 तासात व्हाईसरॉय सोबत असे काय घडले की नेहरूंनी आपली भूमिका बदलली, त्याचे पुरावे आता समोर येत आहेत.
सावरकरांचे नाव घेऊन जाणीवपूर्वक आपली पापे लपवून गांधी घराण्याची पापे विसरण्यासाठी हे सर्व सांगत आहेत, ते मूर्खपणा असेल. ज्या कुटुंबाने देश तोडला, राजीव गांधींनी एलटीटीमध्ये काय केले, इंदिरा गांधींनी पंजाबमध्ये काय केले, त्यांनी हा देश तोडला, त्यांनी जोडण्याविषयी बोलू नये, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांच्या वक्तव्याबाबत मी पोलिसांत तक्रार दिली आहे, असेदेखील टीटी रणजित यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. माफी मागून हा प्रश्न सोडवण्याबाबत राहुल गांधी म्हणाले, माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत. भारतात लोकशाहीवर हल्ला होत आहे. याची रोज नवी उदाहरणे मिळत आहेत. मी संसदेत पुरावे दिलेत. माझ्या पुढच्या भाषणाला पंतप्रधान घाबरले होते, त्यामुळे मला अपात्र ठरवण्यात आले आहे, अशी टीका त्यांनी केली होती.