Vasant More: वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रया म्हणाले...
मनसेचे वसंत मोरे यांनी राजीनामा दिला आहे. सकाळी नाराजीची फेसबुक पोस्ट आणि दुपारी राजीनामा दिला. अखेरचा जय महाराष्ट्र , साहेब मला माफ करा अशी पोस्ट करत मोरे यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे पहिली प्रतिक्रिया देताना भावूक झाले.
वसंत मोरे पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले की, माझी भूमिका कायम पक्षाच्या हिताची. माझ्याबद्दल नकारात्मक गोष्टी पोहचवल्या. अजून किती अपमान सहन करायचा. माझ्या एकनिष्ठतेचा कडेलोट झाला. मला तिकीट मिळू नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केलं. परतीचे दोर पदाधिकाऱ्यांनी कापलं. माझ्या सहकाऱ्यांवर दबाव टाकला. आता मला नेत्यांचं फोन येत आहेत. निवडणूक लढणं हा गुन्हा आहे का?
राज ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागितली पण वेळ दिली नाही. मी कुठल्याही पक्षात गेलेलो नाही. मनसेची पुण्यातील कार्यकारणी चुकीच्या लोकांच्या हातात. कोअर कमिटीतील काही नेते माझ्याविरोधात होते. पुणेकर जो म्हणतील तो निर्णय मी घेणार. चुकीचा लोकांमुळे पक्षाचा ऱ्हास. कोणत्याही परिस्थितीत मनसेमध्ये पुन्हा जाणार नाही. मी पुणे शहरातून लोकसभा निवडणुक लढण्यासाठी इच्छुक आहे. मनसे पुण्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. पुणेकर म्हणाले तर निवडणूक लढणार. 2 दिवसांत पुढील भूमिका स्पष्ट करणार. शरद पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे म्हणाले.