वर्षा गायकवाड अस्लम शेख मंत्रिमंडळ बैठकीतुन तडकाफडकी बाहेर
Varsha Gaikwad Aslam Sheikh : मंत्री वर्षा गायकवाड आणि नेते अस्लम शेख मंत्रिमंडळ बैठक सोडून अचानक उठून बाहेर पडले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत असे काय घडले ज्यावरुन हे मंत्री बाहेर पडले आहेत. अशी चर्चा सुरु झाली आहे. नामांतराचे प्रस्ताव मांडण्यात आल्याने काँग्रेस नाराज झाली आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. (Varsha Gaikwad Aslam Sheikh out of the cabinet meeting)
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता नाट्य अधिक रंगतदार होत असून यातील महत्त्वाचे सैन्य म्हणजेच एकनाथ शिंदे गट आता गुवाहटीतून बाहेर पडत आहे. मागील दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या बाहेर असलेले शिवसेनेतील बंडखोर आमदार अखेर गुवाहटीतून बाहेर पडले आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे शिवसेना तसेच अपक्ष आमदार नुकतेच गुवाहटी विमानतळावर दाखल झाले आहेत. येथून त्यांची विमानं गोव्याच्या दिशेने टेक ऑफ करणार आहेत. संध्याकाळी साडे पाच ते साडे सहा वाजेच्या दरम्यान, शिंदेंचा हा ताफा गोव्यात उतरणार आहे, अशी योजना आखण्यात आली आहे.