उल्हासनगर गोळीबारांवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

उल्हासनगर गोळीबारांवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

उल्हासनगरमध्ये पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबाराची घटना घडली. हिल लाईन पोलिस ठाण्यामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

उल्हासनगरमध्ये पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबाराची घटना घडली. हिल लाईन पोलिस ठाण्यामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे. गणपत गायकवाडांनी ही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भाजप आमदारासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. भाजपा आमदार- शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले आहे. तसेच उल्हासनगर येथील गोळीबारांवरून नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नाना पटोले यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, उल्हासनगर येथे शिंदे गटाच्या कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला आहे. उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच हा गोळीबार झाल्याच्या बातम्या येतं आहेत. गणपत गायकवाडांनी झाडलेल्या गोळ्यांनी जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळते.

बेकायदेशीर मार्गाने स्थापना झालेलं शिंदे - फडणवीस यांचं सरकार राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी ठरल्याचे वारंवार सिद्ध होतं असताना आता भाजपाचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शहर अध्यक्षावर पोलिस ठाण्यातच गोळीबार करतात ही गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी कांही दिवस सत्तेत राहणं म्हणजे महाराष्ट्रासमोरील संकट आहे, हें वरील घटनेवरून सिद्ध होतं. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षावर गोळीबार होतं असेल तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल महाराष्ट्रात? भाजपाच्या आमदारांची पोलिस ठाण्यात गोळीबार करण्यापर्यंत मजल जात असेल तर यामागील सत्तेची मस्ती महाराष्ट्र उतरवल्याशिवाय राहणार नाही असे नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com