Kanpur Violence
Kanpur Violenceteam lokashahi

Kanpur Violence : भाजप प्रवक्त्याच्या निषेधार्थ कानपूरमध्ये दोन गटांमध्ये जुंपली

PM मोदींच्या दौऱ्यापुर्वीच दोन गट रस्त्यावर
Published by :
Shubham Tate
Published on

कानपूरमध्ये आज दोन समुदायांमध्ये जोरदार दगडफेक झाली. कानपूरमधील परेड स्क्वेअर येथे मुस्लिम समाजातील काही लोकांनी भाजपच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या निषेधार्थ दुकाने बंद केली. ज्यानंतर वाद निर्माण झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर जमा झाले होते. अनेक पोलिस (Police) ठाण्याचे फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. मात्र, आता परिस्थिती सामान्य असल्याचे पोलिस आयुक्तांचे म्हणणे आहे. (uttar prades clashes in kanpur between two groups uproar over closing market)

Kanpur Violence
Rajya Sabha Elections : महाविकास आघाडी अन् भाजपने एकमेकांना दिला असा प्रस्ताव

त्यात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. येथील परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर बाजार बंद करण्यासाठी बाहेर पडलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी कानपूरमधील परेड स्क्वेअरजवळ दगडफेक केली. यामध्ये दोन जण जखमी झाले. पोलिसांनी या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली.

त्यानंतर येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. प्रत्यक्षात येथील बाजार बंद करण्यासाठी दोन गट समोरासमोर आले होते. त्यामुळे यतिमखाना चौकाजवळ दगडफेक करण्यात आली. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम संघटनांच्या वतीने हा मोर्चा पुकारण्यात आला होता. मात्र यानंतर दोन्ही गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली असून दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शेकडो लोकांनी येथे दगडफेक केली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून लाठीचार्ज केला. गोळीबार करण्यात आला असून, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com