'शिंदे सरकार म्हणजे दिल्लीत मुजरा अन् गल्लीत गोंधळ'
मुंबई : शिवसेनेचा आज शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणात शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. गद्दारांना गद्दारच म्हणाणार. कारण मंत्रिपदे तुमच्या बुडाला जरी चिकटली तरी कपाळावरील गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही, अशी टीका उध्दव ठाकरेंनी केले आहे.
उध्दव ठाकरे म्हणाले की, ज्यावेळेस शिवसेनेतील काहींनी गद्दारी केली. गद्दारांना गद्दारच म्हणाणार. कारण मंत्रिपदे तुमच्या बुडाला जरी चिकटली तरी कपाळावरील गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही. दरवर्षी परंपरेप्रमाणे याहीपर्षी रावणदहन होणार आहे. यावेळेचा रावण वेगळा आहे. जसा काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आता 50 खोक्यांचा खोकासूर आणि धोकासूर आहे. ज्यावेळेस मी शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये होतो. तेव्हा माझी बोटेसुध्दा हालत नव्हतची. मी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. तेव्हा कटप्पा मी उभा राहू शकणार नाही यासाठी कार्यरत होते. परंतु, माझ्या मागे आई जगदंबेची शक्ती आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
ज्यांना आपण सगळ्यांनी सगळे काही दिले. ते नाराज होऊन गेले. परंतु, ज्यांना दिले नाही ते माझ्यामागे उभे राहीले. हे माझे भाग्य आहे. ही शिवसेना एकट्याची नाही. तुम्हा सर्वांची आहे. तुम्ही ठरवणार आहे मी शिवसेना पक्षप्रमुख पदी राहणार की नाही. एक जरी शिवसैनिक म्हंटला गेटआऊट तर मी पायऱ्या उतरु जाईल. पण, हे तुम्ही सांगायचे गद्दारांनी नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
मोठमोठे प्रकल्प गुजरातेत जात आहेत. आणि हे मिंधे सरकार हे माना खाली घालून बसलेत. पुष्पा म्हणतो झुकेगा नही साला आणि हे म्हणातहेत उठेगा नही साला. एकबार झुकेगा तो उठेगाही नही. शिंदे सरकारचे 100 दिवस होत आहेत. त्यातील 90 दिवस दिल्लीत गेले असतील. तिथे मुजरा करायला. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ सुरु आहे, असा टोलाही उध्दव ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला आहे.