विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले; आमची विचारधारा वेगळी, पण...

विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले; आमची विचारधारा वेगळी, पण...

भाजपविरोधात पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक पार पडली आहे. यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला
Published on

पाटणा : भाजपविरोधात पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक पार पडली आहे. यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेही उपस्थित होते. आपली विचारधारा वेगळी असू शकते पण देश एक आहे. लोकशाहीवर हल्ला करणाऱ्याचा आम्ही विरोध करू, असे उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे. तर, पुढील बैठक 10 अथवा 12 जुलै रोजी शिमला येथे होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले; आमची विचारधारा वेगळी, पण...
वाघाला पराभूत करण्यासाठी जंगलातले सर्व प्राणी एकत्र आलेत; मुनगंटीवारांचे विरोधकांवर टीकास्त्र

उद्धव ठाकरे म्हणाले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व लोक इथे जमले आहेत. आपली विचारधारा वेगळी असू शकते पण देश एक आहे. हा देश वाचवण्यासाठी आणि त्याची अखंडता टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. लोकशाहीवर हल्ला करणाऱ्याचा आम्ही विरोध करू. देशात कोणीही हुकूमशाही आणत असेल, आम्ही त्याच्या विरोधात उभे राहू, असे ठाकरे म्हणाले. सुरुवात चांगली झाली की भविष्याही चांगलंच होईल याची मला खात्री आहे. आपण भेटत राहू. आम्ही विरोधक नाही, तर देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

हा विचारधारेचा लढा आहे : राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भाजप आणि आरएसएस भारताच्या पायावर हल्ला करत आहेत. हा विचारधारेचा लढा असून आम्ही एकत्र उभे आहोत. आम्ही ठरवले आहे की आम्ही एकत्र काम करू आणि आमच्या समान विचारधारेचे रक्षण करू. विरोधी ऐक्याची ही प्रक्रिया आहे जी पुढे जाईल.

काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि आम्ही गेली 25 वर्षे एकमेकांविरुद्ध निवडणूक लढत होतो, मात्र सर्व विसरून आम्ही एकत्र आलो.

दरम्यान, विरोधी पक्षांची पुढील बैठक शिमल्यात होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की आम्ही 10 किंवा 12 जुलै रोजी शिमल्यात पुन्हा बैठक घेत आहोत ज्यामध्ये आम्ही एक समान अजेंडा तयार करू. आम्हाला प्रत्येक राज्यात वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल.भाजपला 100 जागांवर रोखू. सर्वांनी एकत्र राहिल्यास भाजपचा पराभव नक्कीच होईल, असा विश्वास खर्गेंनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com