Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Team Lokshahi

'वेदांता प्रकल्प जात होता, तेव्हा शिंदे सरकार काय करत होतं'

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावर उद्धव ठाकरेंचा सवाल
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे जोरदार राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. अशातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा यावर भाष्य केले आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना सध्याचं राज्य सरकार काय करत होतं?असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान सरकारला केला आहे. शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकारी बैठकीत उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केले आहे.

Uddhav Thackeray
कोकण माझ्या शब्दाबाहेर नाही; नारायण राणेंची रिफायनरीबाबत प्रतिक्रिया

हा प्रकल्प जात होते तेव्हा राज्य सरकार काय करत होतं?

शिवसेना पदाधिकारी बैठकीत बोलत असताना ठाकरे म्हणाले की, "गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे हा प्रकल्प गेला, परंतु हा प्रकल्प जात होते तेव्हा राज्य सरकार काय करत होतं? दोन महिन्यात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. पुढे ते म्हणाले की, वेदांता आणि फॉक्सकॅान सारख्या कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याचं नुकसान झालं आहे. हा प्रकल्प हातून गेल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी याचं आत्मपरीक्षण करावं." असे विधान त्यांनी यावेळी बोलताना केलं.

Uddhav Thackeray
भातखळकरांचा शिवसेनेला टोला; म्हणाले, हसरा मेळावा होणार....

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राज्यात जोरदार राजकीय वादंग सुरु असताना त्याच दसरा मेळाव्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, "यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. त्याबद्दल कोणताही संभ्रम ठेवू नका. त्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये रिमांइंडर अर्जही देण्यात आला आहे." त्यासाठीही शाखा स्तरावर बैठका घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

काय दिल्या उद्धव ठाकरेंनी बैठकीत सुचना?

महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांना सोबत घेण्याचे आदेश.मेळाव्याकरता शाखापातळीवरही तयारी करा, दसरा मेळाव्याबाबत मनात कोणताही संभ्रम ठेवू नका.दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, मोठ्या प्रमाणात शिवतीर्थवर गर्दी जमवण्याचे आदेश.अशा सूचना उद्धव ठाकरेंनी बैठकीत बोलताना सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com