उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; मालेगावात आज जाहीर सभा
नाशिक : शिवसेनेत फुट, त्यानंतर गेलेले मुख्यमंत्रीपद, चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच जाहीर सभा आज मालेगाव येथे होणार आहे. शिवगर्जना सभेत उद्धव ठाकरे कोणत्या मुद्यावर बोलणार, याची उत्सुकता राज्याला लागून आहे.
शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांने शिवगर्जना सभा घेऊन त्या आमदारांचा समाचार घेण्याची रणनिती आखलेली आहे. मालेगाव हा पालकमंत्री दादा भुसे यांचा बाल्लेकिल्ला आहे. तसेच नांदगाव आ. सुहास कांदे यांचा मतदार संघ आहे. उद्धव ठाकरे गटाने अव्दय हिरे यांना मालेगावमध्ये भुसेंच्या विरोधात राजकीय आखाड्यात उतरवण्यासाठी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिलेला आहे. त्यानंतर हिरेंना थेट उपनेतेपदी नियुक्त केलेले आहे.मालेगावात उद्धव ठाकरे गटाची जाहीर सभा घेण्याची चाचपणी करण्यासाठी र्ेंखा.संजय राऊत यांनी दोनदा दौरे केले होते. मालेगावात पत्रकार परिषद घेत खा. राऊत यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या कथित भ्रष्टाचाराची वाच्यता केली होती.त्याचबरोबर खा.विनायक राऊत यांनीही मालेगावात गत आठवड्यात सभेच्या तयारीची आढावा बैठक घेऊन त्यानंतर पत्रकार परिषदेत पक्षातील गद्दार सभेत रडारवर असतील, असे संकेत दिले होते. पालकमंत्री भुसे यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ झाला होता.
पालकमंत्री भुसे यांनी अधिवेशनात राऊत यांना प्रतिउत्तर देत मालेगावात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मालेगाव येथे राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. शिवगर्जना सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांंच्या बैठका झालेल्या आहेत. सभेच्या पूर्वसंध्येला खा. संजय राऊत यांच्यासह खा.विनायक राऊत तळ ठोकून होते.शिवगर्जना सभेला जमणार्या गर्दीवरून अव्दय हिरे यांच्या कसमादेमधील बलस्थानाचीही प्रचिती दिसून येणार असल्याने जाहीर सभेच्या निमित्ताने हिरे यांचे राजकीय वजन समोर येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ही सभा उत्तर महाराष्ट्राला उर्जितावस्था देईल, अशी चर्चा कार्यकर्ते, पदाधिकार्यांमध्ये आहे.