उद्धव ठाकरे औरंगाबादेत करणार पाहणी दौरा; त्याआधीच सत्तार शेतकऱ्यांच्या बांध्यावर
सचिन बडे | औरंगाबाद : राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतींची पाहणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद येथे पाहणी दौरा करणार आहेत. परंतु, त्याआधीच कृषीमंत्री व शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार शेतकऱ्याच्या बांध्यावर पोहोचले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी उध्दव ठाकरे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा दौरा करणार आहेत. मात्र, त्याआधीच अब्दुल सत्तार यांनी थेट शेतकऱ्यांचे बांध गाठायला सुरुवात केली आहे. अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आणि घरी जाऊन अब्दुल सत्तार यांनी भेटी दिल्या. या भेटीगाठी दरम्यान काही शेतकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या समोरच अश्रूचा बांध फोडला. तर, औरंगाबाद जिल्ह्यातील एका कुटुंबाला आर्थिक मदत दिली.
दरम्यान, मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. शेतकरी हतबल झाल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतात गेल्या चार दिवसांपासून गुडघ्याला लागेल इथपर्यंत पाणी तुंबले आहे. परतीच्या पावसाने मोठं नुकसान केलं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच अनुषंगाने उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, ठाकरे हे काही शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करून ठाकरे शेतकऱ्यांसाठी पॅकेजची मागणी करण्याची शक्यता आहे.