Uddhav Thackeray | Prithviraj Chavan
Uddhav Thackeray | Prithviraj ChavanTeam lokshahi

आमच्या हातात काहीच नाही, उद्धव ठाकरे यू टर्न घेतील वाटत नाही - पृथ्वीराज चव्हाण

उद्धव ठाकरे भाजपसोबत जायला तयार आहेत का?
Published by :
Shubham Tate
Published on

Prithviraj Chavan Uddhav Thackeray : आपली ही भूमिका वैयक्तिक आहे, याचा पक्षाशी काही संबंध नाही असं म्हणत काँग्रेसचे (Congress) नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडणार म्हणजे ते भाजपसोबत जाणार आहेत का? गुवाहाटीत शिवसेनेचे ४५ आमदार जमल्याचे फोटो पाहून शिवसेना दबावाखाली ही भूमिका घेत आहेत का? महाविकास आघाडीतून बाहेर पडून उद्धव ठाकरे भाजपसोबत जायला तयार आहेत का? शिवसेना पुन्हा दुय्यम भूमिका स्वीकारायला तयार आहे का?, अशा प्रश्नांची सरबत्ती पृथ्वीराच चव्हाण यांनी केली. (Uddhav Thackeray will take a U turn Prithviraj Chavan)

Uddhav Thackeray | Prithviraj Chavan
एकनाथ शिंदेंच्या चालीने उद्धव ठाकरे चेकमीट

कालच्या भाषणात उद्धवजी असे काही बोलले नाहीत. ते काही आमदारांच्या दबावाखाली असा निर्णय घेतील, असे मला वाटत नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी यावेळी स्पष्ट केले. शेवटी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. याबाबत निर्णय शिवसेनेनेच घ्यायचा आहे, आमच्या हातात काहीच नाही. काँग्रेस (Congress) पक्षात याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Uddhav Thackeray | Prithviraj Chavan
शिवसैनिक फडणवीसांच्या घरावर करणार हल्ला? पोलीस बंदोबस्त वाढवला

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला ४८ तास उलटून गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला (shivsena) मोठे हादरे बसले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल जनतेशी संवाद साधल्यानंतर जर माझ्याच लोकांना मी नको असेल तर मी वर्षा बंगला सोडून जातो असं म्हटलं आणि त्यानंतर रात्री त्यांनी वर्षा बंगला सोडला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com