उद्धव ठाकरे लागले तयारीला! नोव्हेंबरमध्ये धडाधड बैठकांचं सत्र
गिरीश कांबळे, मुंबई
शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेच्या पुनर्रचनेसाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ऑन ग्राऊंड उतरून काम करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यांच्याबरोबर मराठवाड्यातून अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे मुंबईतून किशोरी पेडणेकर, अनिल परब तर कोकणातून भास्कर जाधव हे सेनेची बाजू ठामपणे मांडत आहेत. तर, शिवसेनेच्या नवनिर्वाचीत उपनेत्या सुषमा अंधारे विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यात कमी पडत नाहीयेत. मात्र, आता स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अॅक्शन मोडमध्ये येणार आहेत.
नोव्हेंबरमध्ये पार पडणार बैठकांचं सत्र:
बैठकांसाठी आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, युवा सेना पदाधिकारी महिला पदाधिकारी, विधानसभा पराभूत उमेदवार यांना निमंत्रण.
31 ऑक्टोबर पासुन 14 नोव्हेंबर पर्यंत मातोश्री निवासस्थानी बैठकांचं सत्र पार पडणार.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा बैठकीत आढावा घेतला जाणार.
आगामी काळातील मित्र पक्षांसोबतच्या युती बाबत या बैठकांनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती.
31 ऑक्टोबर पासुन 14 नोव्हेंबर पर्यंत मातोश्रीवर चालणाऱ्या या बैठकांच्या सत्राचा शिवसेना पक्षाच्या पुर्उभारणीला फायदा होणार का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.