शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच; उध्दव ठाकरेंचा हुंकार
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेचा 'दसरा मेळावा' हायजॅक करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु, आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना हे निष्ठावंतांच्या रक्तावर मोठी होणारी आहे. गद्दारांच्या मेहनतीवरती नाही, असा निशाणाही उध्दव ठाकरेंनी शिंदे सरकारवर साधला आहे.
कॉंग्रेसचे संतोष टर्फे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी ते म्हणाले, संघ परिवातील लोक शिवसेनेच्या परिवारात आले आहेत. आता रोजच प्रवेश सुरु आहे. नेहमी सत्ताधारी पक्षाकडे प्रवेशासाठी रांग लागते. पण, आज महाराष्ट्रात प्रथमच वेगळे चित्र दिसत आहे. गद्दारीनंतर महाराष्ट्रातील माती मर्दांना जन्म देते. गद्दारांना जन्म देत नाही याची प्रचिती दाखवणारी हे प्रवेश आहेत, असा घणाघात त्यांनी शिंदे सरकारावर केला.
भाजपने आम्ही हिंदुत्व सोडले ही आरोळी उठवली होती. ही घटना त्याला प्रत्त्युत्तर आहे. अनेक विषयांवर दसऱ्या मेळाव्यात बोलणार आहे. संभ्रम पसरवणाऱ्यांना पसरवू द्या. परंतु, शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, अशी घोषणा त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. हिंदुत्वाच्या भ्रामक कल्पनेत फरफट झाली. हे हिंदुत्व नव्हतेच. त्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. त्यांनी शिवसेनेत यावे, असे आवाहन उध्दव ठाकरेंनी केले आहे. तसेच, शिवसेना हे निष्ठावंतांच्या रक्तावर मोठी होणारी आहे. गद्दारांच्या मेहनतीवरती नाही, असा निशाणा उध्दव ठाकरेंनी शिंदे सरकारवर साधला आहे.
दरम्यान, कॉंग्रेसचे संतोष टर्फे यांच्यासह शेतकरी नेते अजित मगर यांनीही उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.