पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका! उध्दव ठाकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, 70 हजार कोटी...

पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका! उध्दव ठाकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, 70 हजार कोटी...

उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. रायगड येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
Published on

रायगड : शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी शिर्डीतील सभेतून केला होता. या टीकेला आता उध्दव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काल मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण स्टेजवर कोणीतरी बसलं होते, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. रायगड येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका! उध्दव ठाकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, 70 हजार कोटी...
महाराष्ट्र सरकार गुजरातमधून चालवायचं हेच शिंदे-भाजपाचं ध्येय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

उध्दव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 70 हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण स्टेजवर कोणीतरी बसलं होतं. ते म्हणाले की शरद पवार यांनी शेतीसाठी काही केलं नाही. परंतु, 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शरद पवारांनीच केली होती. किती सुडाचं राजकारण कराल, असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना केला आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

महाराष्ट्रातील बडे नेते केंद्रात बराच काळ कृषीमंत्री होते, वैयक्तिकरित्या सन्मान करतो. मात्र, माजी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा सवाल विचारत पंतप्रधान मोदी यांनी अजित पवारांसमोरच शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com