चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार
पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने द्यावा असं न्यायालयाने सांगितल्यानंतर काल भारताच्या निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा बहुप्रतिक्षित निर्णय दिला. धनुष्यबाण हे चिन्ह पुढील निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. तसंच शिवसेना हे नावही वापरता येणार नाही शिवसेना या नावासोबतच आणखी काही शब्द जोडावा लागणार आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6 वाजता माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत.
उद्धव ठाकरे काय बोलण्याची शक्यता?
शिवसेना पक्षाच्या तात्पुरत्या निवडणूक चिन्हाची घोषणा करण्याची शक्यता.
पक्षासाठी नव्या नावाची घोषणा होऊ शकते.
निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा राजकीय दबावातून असल्याचा दावा करून भाजप-शिंदेगटावर टीका करण्याची शक्यता.
शिवसैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी उपदेशपर भाष्य करण्याची शक्यता.
शिवसेनेनं निवडणूक आयोगाला सुचवलेली तीन नावं अन् चिन्ह:
नावं:
शिवसेना बाळासाहेब ठाकरे
शिवसेना
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
चिन्ह:
त्रिशूल
उगवता सूर्य
मशाल