दुष्काळात तेरावा महिना म्हणजे आताच सरकार; उध्दव ठाकरेंचा घणाघात

दुष्काळात तेरावा महिना म्हणजे आताच सरकार; उध्दव ठाकरेंचा घणाघात

सलीम कुत्ता प्रकरणीवरून विधान परिषदेत गोंधळ झाला आहे. शिंदे गटाने सुधाकर बडगुजर यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
Published on

नागपूर : सलीम कुत्ता प्रकरणीवरून विधान परिषदेत गोंधळ झाला आहे. यावरुन गिरीश महाजान आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. तर, शिंदे गटाने सुधाकर बडगुजर यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

दुष्काळात तेरावा महिना म्हणजे आताच सरकार; उध्दव ठाकरेंचा घणाघात
मराठा आरक्षणावर माझ्याकडे उपाय, पण या चोरांना तो सांगणार नाही; आंबेडकरांचे टीकास्त्र

उध्दव ठाकरे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना हे अधिवेशन भरकवटायचं आहे. या अधिवेशनाची सुरवात नवाब मालिकांपासून झाली होती, इकबाल मिरचीचे काय प्रफुल्ल पटेल यांच काय? नवाब मलिक यांच्यावर कोणतं गोमूत्र शिंपडलं, कोणत्या मशीनमध्ये घातलं. मिरचीसोबत व्यापार करणारे आता तुम्हाला आपले वाटायला लागले? मिरची गोड झाली का? माझा शेतकरी जो मिर्ची पिकवतो ती ह्यांना महत्वाची नाही, दाऊदची मिर्ची महत्वाची आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

संकटकाळात जर बळीराजाच्या मदतीला कोण धावून येत नसेल, तर मग त्यांचीसुद्धा चौकशी लावा. सरकारचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई होत नाही. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे आताच घटनाबाह्य सरकार आहे. आम्ही जे पुरावे तुमच्यासमोर मांडतो आहोत, त्याची चौकशी करून कारवाई करावी. आमचा सुतराम संबंध नसताना तुम्ही एसआयटी लावत असाल, तर मग आमच्याकडे तुमच्याविरोधात पुरावे असूनही तुम्ही कारवाई का करत नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

धारावीच्या माध्यमातून आमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे निर्णय घेणार असाल, तर ते आम्ही कसे सहन करू? ह्या सरकारसारखा उघडा नागडा कारभार आधीच्या कुठल्याच सरकारने महाराष्ट्रात केलेला नाही. मोर्च्याला आम्ही माणसं चंद्रावरून आणली होती, पण मुद्दा मुंबईचा होता. माणसांवर बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोला, असे त्यांनी म्हंटले आहे.

तसेच, ज्यांनी शिवाजी महाराजांच्या चरणाची शपथ घेतली त्यांनी चर्चा करण्यापेक्षा इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या. कोणत्याही समाजाचं तसूभरही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण कसे देणार आहात, हे तुम्ही आम्हाला सांगायला हवं, चर्चा कसली करताहेत, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस हब सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केले. गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल, असे विधान यांवेळी पंतप्रधान मोदींनी केले. यावरही उध्दव ठाकरेंनी भाष्य केले आहे. मोदीजी आपण देशाचे पंतप्रधान आहात गुजरातचे मुख्यमंत्री नाही, असे उध्दव ठाकरेंनी पंतप्रधांनांना सुनावले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com