सरकार आंदोलकांच्या जीवाशी खेळतंय; जरांगेंची प्रकृती खालवल्यावरून उद्धव ठाकरेंची टीका

सरकार आंदोलकांच्या जीवाशी खेळतंय; जरांगेंची प्रकृती खालवल्यावरून उद्धव ठाकरेंची टीका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार आंदोलकांच्या जीवाशी खेळतंय, असा निशाणा उध्दव ठाकरेंनी सरकारवर साधला आहे.

सरकार आंदोलकांच्या जीवाशी खेळतंय; जरांगेंची प्रकृती खालवल्यावरून उद्धव ठाकरेंची टीका
जरांगेंची प्रकृती खालावली; शरद पवार म्हणाले, राज्य सरकारने...

उद्धव ठाकरे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे. व ते त्यांना मिळायला हवे. ओबीसी, आदिवासी सह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जरांगे पाटील उपोषण करीत आहेत पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत. समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करत आहे. पण, त्यांचे मन निर्दय आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com