राजकारण
सरकारची सीबीआय चौकशी करा; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
राज्यात रुग्णांलयातील मृत्यूप्रकरणामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राज्यात रुग्णांलयातील मृत्यूप्रकरणामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नांदेडच्या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत हे बघून संताप येत आहे. कोरोनाचा संकट होतं तेव्हा मविआचा सरकार होते. आरोग्य यंत्रणा तीच आहे. या आरोग्य यंत्रणेने कोरोनाचा सामना केला. दसरा मेळाव्यात मी विस्ताराने बोलणार आहे.
या सरकारकडे गुवाहटी, गोव्याला जाऊन मौजमजा करण्यासाठी पैसे आहेत परंतु रुग्णांवर उपचार करायला पैसे नव्हते. त्यामुळे या सरकारची सीबीआय चौकशी करा. रुग्णालयात गेलेल्या जीवाला जबाबदार कोण? आणि जबाबदारी कधी घेणार? असे उद्धव ठाकरे म्हणाले.