Uddhav Thackeray : निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने मत मागता येतात का?

Uddhav Thackeray : निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने मत मागता येतात का?

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवालयाचे उद्‍घाटन करण्यात आले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने मत मागता येतात का? मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून हा प्रश्न विचारला होता. याआधी मोदींनी बजरंगबलीच्या नावाने मतं मागितली होती. येत्या निवडणूकीत आम्हीसुद्धा देवाच्या नावाने मतं मागू. आम्हीही धर्माच्या नावावर मते मागू तेव्हा तुम्हाला कारवाई करता येणार नाही. हरहर महादेव, जय शिवाजी जय भवानीच्या नावाने मते मागू. आम्ही धर्माच्या नावावर मते मागायची का.

तसेच उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या. अवकाळीचे पंचनामे सुरु झालेले दिसत नाहीत. राज्यातलं सरकार म्हणजे दुष्काळातलं तेरावा महिना. शासन आपल्या दारी हा बोगसपणा. कारण सरकारला कोण दारात पण उभं करत नाही. राज्यात शेतकऱ्यांची वाईट अवस्था. मी शेतकऱ्यांना 2 लाखांचे कर्ज माफ केलं होते. 16 डिसेंबरला ठाकरे गटाचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ म्हणून जो बोगसपणा सध्या सुरु होता तो आता बंद पडला आहे. कारण कुणी त्यांना दारात पण उभं करायला तयार नाही.

सरकारला जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरणार. धारावी ते अदानींच्या कार्यालयापर्यंत मोर्चा असणार आहे. मुंबईतली वीजबिलंही वाढली आहेत. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com