Uddhav Thackeray: गुन्हेगाराचा सुपडा साफ झालाच पाहिजे - उद्धव ठाकरे
शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातून मोदी सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. सावंतवाडी येथील सभेत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. मेडिकल कॉलेज साठी मी परवानगी दिली. आता मला काय माहित तिकडे कोंबड्या ठेवल्यात की काय केले? चांगल्या गोष्टीच्या आड मी येणार नाही ही आमची वृत्ती आहे. सरकारचे मेडीकल कॉलेज होऊ नये यासाठी कोण दिल्लीत जाऊन बसले होते हे मला बोलायला लावू नका अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
गोळीबारची पटकन cctv फुटेज बाहेर आले. कोणी न मागता ते cctv आले. आमच्याकडे फुटेज नाही मागितल पण ते निवडणूक आयोगाकडे मागितले. हे पाहिजे असून मागितले नाही पण गणपत गायकवाड यांचा विडिओ बाहेरून आला. मी त्यांची बाजू घेत नाही पण शिंदे मुख्यमंत्री राहिले तर गुन्हेगारी वाढणार आहे. मिंदे आणि मिंद्यांच्या वाटेतील काटा बाजूला केला तर त्यांना कोण विरोधक राहणार नाही. देशात हुकुमशाही असणार आहे. मिंधे यांची गँग आणि भाजपची गँग मुंबईत आहे. तिसरी सिंचन घोटाळ्याची गँग आहे. मोदीजी आम्ही तुमचे शत्रू नव्हतो तुमच्यासोबत आमी लढत होतो पण तुम्ही आम्हाला बाजूला केले. जर तुम्ही जनतेचे काम केले असते तर पक्ष फोडायची गरज पडली नसती. गोळीबार केल्यानंतर उल्हासनगरमधील आमदार गणपत गायकवाड म्हणतात, मिंधेंकडे माझे करोडो रुपये आहेत. आता मोदींची गॅरंटी मिंधेना पावणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेना कोणाची हे तुम्हाला विचारायला आलो आहे. डबल गद्दार त्याचं नाव घेण्याची गरज नाही. आपल्याकडे आले होते तेव्हा अपेक्षेने घेतलं होत. आठवड्याला साईबाबांकडे जातात तेव्हा वाटलं होत माणूस बरा दिसतो. श्रद्धा आणि सबुरी असेल, पण त्याची कोणाची श्रद्धा नाही सबुरी तर नाहीच नाही. जी काही वळवळ एका मतदारसंघात राहिली आहे त्याचा सुपडासाफ करून टाका, असे उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले.