मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण...; उध्दव ठाकरेंचे मोठे विधान

मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण...; उध्दव ठाकरेंचे मोठे विधान

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कंबर कसली असून लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीचा धडाका सुरु आहेत.
Published on

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कंबर कसली असून लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीचा धडाका सुरु आहेत. आज माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी उध्दव ठाकरेंनी मोठे वक्तव्य केले आहे. मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण ते माझ्या नीतिमत्तेत बसत नव्हतं, असे त्यांनी म्हंटले आहे.

मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण...; उध्दव ठाकरेंचे मोठे विधान
मी फडणवीसांवर आता कधीचं बोलणार नाही; का म्हणाल्या सुप्रिया सुळे असं?

मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण ते माझ्या नीतिमत्तेत बसत नव्हतं. ज्यांनी 2014 पासून आपल्याला फसवलं (2014 विधानसभा, 2017 मुंबई महापालिका आणि 2019 मातोश्रीत दिलेला मुख्यमंत्री पदाचा शब्द नाही पाळला) त्यांच्यासोबत कसे काय जाणार, असा सवाल उध्दव ठाकरेंनी उपस्थितांनी केला. मी मुख्यमंत्री होतो. माझ्या आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. पण जे मनाने फुटले होते त्यांना डांबून काय करणार होतो? त्यांना काय कमी केलं मी? असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या टप्यातील 16 लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका मातोश्रीवर सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात 16 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची सुद्धा यावेळी माहिती ठाकरेंनी घेतली. मराठवाडा आणि विदर्भाचा आढावा 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान ठाकरेंकडून घेतला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com