भाजपची कितीही कुळं आली तरी शिवसेना नष्ट करू शकणार नाहीत; उद्धव ठाकरे आक्रमक
Uddhav Thackeray : आज शिवसेनेच्या मार्मिकचा 62 वा वर्धापण दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर बोचरी टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, व्यंगचित्रकार बदलले खाळ बदलला पण परिस्थिती तशीच आहे. तसेच तिरंगा आहे पण जनतेकडे घरचं नाही त्यांनी तिरंगा कुठे फडकवायचा असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यात सत्तेत आलेल्या आणि केद्रातील सरकारवर देखील यावेळी ठाकरेंनी सडकून टीका केली. (Uddhav Thackeray criticizes BJP)
यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेना नसती तर मुंबई आणि देशातील हिंदूंच काय झालं असतं. त्यामुळे भाजपची कितीही कुळं आली तरी शिवसेना कोणीही नष्ट करू शकणार नाही. तसेच भाजपला संघ राज्य पद्धत संपवायची आहे का? असा देखील सवाल यावेळी ठाकरेंनी केला. तसेच मार्मिक आणि शिवसेनेकडे कायम तरुणांच आकर्षण असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतमाता आपलीच मालमत्ता असल्याच काहींना वाटत आहे. केवळ तिरंगा फडकावून राष्ट्रभक्त होता येत नाही. राज्यात सध्या पूरग्रस्त भागात जायला खाती नाहीत, मंत्रीपद मिळालं पण खातीच नाहीत. खातेवाटपाच्या दिरंगाईमुळे त्यांनी राज्यातील सरकारवर तोंड सुख घेतलं.