Uddhav Thackeray : राज्यपाल कोश्यारींना  कोल्हापुरी जोडे दाखवा

Uddhav Thackeray : राज्यपाल कोश्यारींना कोल्हापुरी जोडे दाखवा

उध्दव ठाकरे यांनी सोडले राज्यपाल भगत सिंह कोश्यारींवर टीकास्त्र
Published on

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही राज्यपालांवर टीकास्त्र सोडले आहे. आता त्यांना कोल्हापूरचा जोडा दाखवा, अशा शब्दांत उध्दव ठाकरेंनी टीका केली आहे.

Uddhav Thackeray : राज्यपाल कोश्यारींना  कोल्हापुरी जोडे दाखवा
मराठी माणसाला डिवचू नका; राज ठाकरेंचा राज्यापालांना इशारा

उध्दव ठाकरे म्हणाले की, मुद्दामून जय हिंद, जय महाराष्ट्रने सुरुवात करतात. राज्यपाल पदाचा अवमान करू इच्छित नाही त्या खुर्चीचा मान त्या खुर्चीत बसणाऱ्याने सुद्धा ठेवला पाहिजे. महाराष्ट्राच्या नशिबी असे लोक का येतात. तीन वर्षे महाराष्ट्रात राहून सगळं ओरबाडलं आहे. कोल्हापूरचा जोडा सुद्धा त्यांना दाखवायची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी केली.

कोरोना काळात यांना सर्व धर्मियांची मंदिरं खुली करायची होती. तीन वर्षे मान सन्मान, महाराष्ट्राचं वैभव पाहिलं असेल. आता त्यांना कोल्हापूरचा जोडा दाखवा, कोल्हापूरी वाण ही संस्कृतीचा भाग आहे. परंतु, आता कोल्हापूरचा जोडा दाखवायची वेळ आली आहे, अशा शब्दांत त्यांनी कोश्यारींना लक्ष्य केले आहे.

Uddhav Thackeray : राज्यपाल कोश्यारींना  कोल्हापुरी जोडे दाखवा
VIDEO : "गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही"

आज त्यांनी कहर केलाय दिल्लीतून अशी भाषणं त्यांना लिहून येतात का कल्पना नाही. ही मुंबई हक्काने मिळवली आहे कोणी आंदण दिलेली नाही. मराठी माणसाच्या मनात त्यांनी आग लावलीच आहे. पण, हे राष्ट्रपतीचे दूत असतात शपथ घेताना जातपात-धर्म बाजूला ठेवून ते वागणूक देतात. परंतु, त्यांनी हे कर्तव्य मोडले आहे त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा, असा प्रश्नही विरोधकांना विचारला आहे.

हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा गुन्हा त्यांनी केला आहे. ज्या महाराष्ट्राचे मीठ खात आहेत त्यात नमकहरामी केली. हे पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल आगी लावत असेल तर तात्काळ वरिष्ठ स्तरावर निर्णय घ्यावा. त्यांना नुसतं घरी पाठवायचं की तुरंगात पाठवायचं हा विचार करण्याची वेळ आली आहे, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

राज्यापालांच्या खुलासा बद्दल मला बोलायचं नाही. त्यांनी राज्यपाल पदाची शान घालवली आहे. त्यांचं वक्तव्य केवळ ओठातून की त्यांच्या पोटात बसून कोणी दुसऱ्याने आणलंय हा संशोधनाचा विषय आहे. दिल्लीत बसणाऱ्यांचा जीव मुंबईत आहे तो का कारण पैसा अनावधनाने त्यांनी हा हेतू बोलण्यातून स्पष्ट केलं. त्यांचा डोळा मुंबईच्या पैशांवर आहे एवढेच सांगेन, अशी थेट टीका उध्दव ठाकरेंनी मोदी सरकारवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com