हे खंडोजी खोपड्याची औलाद आहेत; उध्दव ठाकरेंचे शिंदेंवर घणाघात
नाशिक : खंडोजी खोपड्याची औलाद म्हणत उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर शरसंधान साधले आहे. मालेगावमध्ये आज उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली आहे. मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमत आहे. पण, शेतकऱ्यांच्या बांधावर यायला त्यांना वेळ नाही. मला उत्तर देण्यासाठी येथे उत्तर सभा घेणार आहेत ना. त्यापेक्षा शेतकऱ्यांना उत्तर द्या, असे आवाहन त्यांनी शिंदे-फडणवीसांना केले आहे.
आजची सभा अथांग पसरली आहे. संजय राऊत बोलले ते खरे आहे नाव चोरल चिन्ह चोरल माझ्या हातात काही नाही तरी एवढी गर्दी आहे. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी अद्वय हिरे यांनी शपथ घेतली. पण, मला मुख्यमंत्री नाही व्हायचं तुमचे प्रश्न सोडवायचे. आता जिंकेपर्यंत लढायचे. मी खासकरून मालेगावकरांना धन्यवाद देतो. कोरोना काळात तुम्ही खूप साथ दिली. तुम्ही सहकार्य केले नसते तर मालेगाव वाचले नसते. मुख्यमंत्री पद येत आणि जात असते. पण, तुम्ही जे प्रेम देत आहे ते मला नाही वाटत दुसऱ्याला मिळालं असेल. नाव चोरल चिन्ह चोरले. पण, ही जिवा भावाची माणसे नाही चोरू शकत. प्रेम विकत घेता येऊ शकत नाही. हा मर्द गडी तिथून येथे आला आहे, असे उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.
दोन शेतकऱ्यांना येथे आवर्जून भेटलो. कांदा उत्पादक शेतकरी येथे आले आहेत. आता कांद्याला भाव नाही. कांद्याला रस्त्यावर फेकावा लागत आहे. परंतु, गेल्यावर्षी एका कांद्याची खरेदी झाली. किती खोक्याला गेला माहित आहे ना, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारेल. अडीच वर्षे आपले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी होत की नाही एवढंच सांगा. दोन लाख ज्यांच्यावर पीककर्ज होत त्यांना लाभ मिळाला होता. शेतकऱ्याला आपल्या पायावर उभे करण्यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे. शेतकऱ्याला हमीभाव मिळालाच पाहिजे. कांद्याची विल्हेवाट लागली. मला उत्तर देण्यासाठी येथे उत्तर सभा घेणार आहेत ना. त्यापेक्षा शेतकऱ्यांना उत्तर द्या, असे आवाहन त्यांनी शिंदे-फडणवीसांना केले आहे.
मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमत आहे. पण, शेतकऱ्यांच्या बांधावर यायला त्यांना वेळ नाही. कृषिमंत्री बघितले का? काळोखामध्ये शेती बघतात. सुप्रिया सुळे यांना शिव्या देणारे कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताच असतात, असं विधान यांनी करायचं. केंद्रीय कृषिमंत्री तोमर.. म्हणजे मर नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. अवकाळी गारपीट झाल्यानंतर मविआ ज्याप्रमाणे मदत करत होते. ते हे करताय का? खंडोजी खोपड्याची औलाद आहेत. गद्दारी करून भगवे झेंडे हातात नाचवता आहे. तुम्ही तुमच्या हाताने गद्दार हा शिक्का कपाळावर मारून घेतला आहे, अशी जोरदार टीका उध्दव ठाकरेंनी केली आहे.